Showing posts with label दोस्त. Show all posts
Showing posts with label दोस्त. Show all posts

Sunday, 23 August 2020

मी

मी


मी कोणालाही न कळलेला...

मी कोणालाही न कळणारा...

मी माझ्या माझ्यामधेच गुंफणारा...


मी थोडासा वेडसर, स्वतःसोबतच हसणारा

मी थोडासा खोडसर, स्वतःलाच बिलगणारा


मी नेहमीच शांत

अंतरंगात दंगणारा


मी भावनांचं गुंफण

मी विचारांचं मंथन

मी अपार, अनिश्चित

मी अतुल्य, अभिक्षित

मी निर्लज्य, बेलगाम

मी क्षणिक, क्षण-भुंगुर


मी लखलखता दिवा

मी लुकलुकता काजवा

मी मावळती रात्र

मी उभारणारा दिवस

मी अंधाराने प्रकाशाशी केलेला सत्तेसाठीचा संघर्ष


मी असाच,

मी कोणालाही न कळलेला...

मी कोणालाही न कळणारा...

  - संपत


Saturday, 30 May 2020

तू | You are everything...

तू

तू | You are everything...
तू 

पहाटेत हरवलेला आभास तू 
स्वप्नतल्या आयुष्याचा भास तू 
स्वछंदी वाऱ्याचा गारवा तू 

सदाबहार माझ्या आयुष्यातील उद्यानातील पारवा तू... 



अशाच काहीश्या मनाला भावणाऱ्या कविता


YOU

You are the Glimpse of the Morning
You are the Flavor of Life
You are the Breath of Fresh Air

You are the evergreen Pigeon of My Life



Tuesday, 26 May 2020

मैत्री | Defining Friendship

मैत्री
 
मैत्री | Defining Friendship
मैत्री


मैत्री म्हणजे...
वेलीवरती उमललेलं फुल 
स्वार्थाची आलेली भूल 

मैत्री म्हणजे 
विधात्याला पडलेलं स्वप्न 
नावरत्नांच्या हारामधलं रत्न 

मैत्री म्हणजे 
पावसाची ती पहिली सर 
कट्ट्यावर उडवलेली टर

मैत्री म्हणजे 
सुख दुःखात दिलेली साथ 
मदतीला नेहमीच पहिला हाथ 

मैत्री,
संकटात मदत करणारी
प्रसंगी कठोरही होणारी 

मैत्री 
दोन मने जोडणारी अरुंद पाऊलवाट 

मैत्रीचा दुसरा अर्थ जणू 
तुझी अन माझी रेशीमगाठ 

- प्रज्योत सर्वोदय

 
Some more feeds

Rise Awareness 


Sunday, 3 May 2020

प्रेम


प्रेम


प्रेम

प्रेम


हसणं म्हणजे काय?
तर आनंदामुळे ओठांवर,
येणारी प्रतिकिया...

आनंद म्हणजे काय?
तर सुखाने भरलेला,
क्षण...

सुख म्हणजे काय?
तर आहे त्यापेक्षा काहीही नको,
असं वाटणारी भावना...

भावना म्हणजे काय? 
तर आयुष्यात असलेला,
"तू"

एकंदरीत 
तू म्हणजे काय, 
तर समाधान पूर्वक घेतलेला श्वास,
श्वासाला असणारी आस, 
आस म्हणजे प्रेरणा देणारा भास,
भास म्हणजे  जिवंत ठेवणारा तू,
तू एकचं ध्यास...


असेच आणखी काही लेख पाहण्यासाठी पहा:


Wednesday, 22 April 2020

Special दोस्त


Special दोस्त 


Special दोस्त


खून का नही,
पर रिश्ता हे हमारा....

जान तो नही,
पर दिल हे हमारा....

बताते तो नही,
पर जान दे भी सकते हे...

जान से भी ज्यादा,
 भरोसा हे हमारा...

जोडीयो मे भी ना हो,
इतना प्यार हे हमारा....

ओर कोई नही,
वो दोस्त हे मेरा...

- pK@.


True 'Friend'


Not of blood,
But we have our relationship…

Don't know about life,
But we are connected by heart

Don't need to explain,
But we're willing to die for each other ...

More than life,
We trust each other...

Even pairs of Love-Birds,
Can't match our love...

No one else,
My friend is a Special one for me...

................_................


Wanna Juice some more: