महाराज तुम्हीं असायला हवं होता...
महाराज तुम्हीं असायला हवं होता...
हर-एक मराठी मनाला अजूनही वाटत...
तुमचे विचार अन कृत्य, तुमच्या कर्तृत्वाशी होते जुळत,
अन आज आमच्या पिढीला त्याचा साधा संदर्भ ही नाही जुळत.
स्वप्न तुमचच होत राज, प्रजाही तितकीच "दक्ष"
चित्र सगळं उलटलंय आता, नाही कोणाचं कोणावर "लक्ष"
महाराजांचा प्रताप आठवावा तितका 'कमी',
अन आजच्या तुमच्या मावळ्यांना स्वतःची सुद्धा नाहीये 'हमी'
महाराज तुम्हीं असायला हवं होता...
हर-एक मराठी मनाला अजूनही वाटत...
तुमचे प्रताप वाचण्या-पुरतेच आम्ही श्रेष्ठ
लढायची वेळ येताच होतात सगळे निकृष्ठ
तुमची जयंती आम्ही राज,
मोठ्या जल्लोषात साजरी करतो...
पण तुमच्या जन्मतारखेतही आम्ही,
आपापल्या गरजेप्रमाणे बदल करतो...
तुमच्या काळात "एकत्र" होती सारी जनता,
आम्ही मात्र 'विभागून' घेतो तुमच्या जन्मतारखा
महाराज तुम्हीं असायला हवं होता...
हर-एक मराठी मनाला अजूनही वाटत...
तुमचच रक्त वाहतंय ह्या धमन्यात,
तुम्हासारखा आम्हीही करू शकतो .
फरक फक्त एवढाच आहे,
"तुम्हा पाठीशी होती तुमची प्रजा;
आम्हा पाठीशी फक्त भेकडांची वानवा"
एकच साकडं राज, मागतो तुम्हा चरणी
आचरण वाढावं आपलं, प्रत्येक मराठी मनी
- मनाली लामणे
अशाच काहीश्या मनाला भावणाऱ्याकविता:
No comments:
Post a Comment