Showing posts with label छत्रपती. Show all posts
Showing posts with label छत्रपती. Show all posts

Monday, 27 April 2020

शिवशासन - महाराज तुम्हीं असायला हवं होता...

महाराज तुम्हीं असायला हवं होता...

शिवशासन

महाराज तुम्हीं असायला हवं होता... 
हर-एक मराठी मनाला अजूनही वाटत...

तुमचे विचार अन कृत्य, तुमच्या कर्तृत्वाशी होते जुळत, 
अन आज आमच्या पिढीला त्याचा साधा संदर्भ ही नाही जुळत.

स्वप्न तुमचच होत राज, प्रजाही तितकीच "दक्ष"  
चित्र सगळं उलटलंय आता, नाही कोणाचं कोणावर "लक्ष"

महाराजांचा प्रताप आठवावा तितका 'कमी',
अन आजच्या तुमच्या मावळ्यांना स्वतःची सुद्धा नाहीये 'हमी'



महाराज तुम्हीं असायला हवं होता... 
हर-एक मराठी मनाला अजूनही वाटत...

तुमचे प्रताप वाचण्या-पुरतेच आम्ही श्रेष्ठ
लढायची वेळ येताच होतात सगळे निकृष्ठ  

तुमची जयंती आम्ही राज, 
मोठ्या जल्लोषात साजरी करतो... 
पण तुमच्या जन्मतारखेतही आम्ही,
आपापल्या गरजेप्रमाणे बदल करतो...

तुमच्या काळात "एकत्र" होती सारी जनता,
आम्ही मात्र 'विभागून' घेतो तुमच्या जन्मतारखा



महाराज तुम्हीं असायला हवं होता... 
हर-एक मराठी मनाला अजूनही वाटत...

तुमचच रक्त वाहतंय ह्या धमन्यात, 
तुम्हासारखा आम्हीही करू शकतो .
फरक फक्त एवढाच आहे,
"तुम्हा पाठीशी होती तुमची प्रजा;
आम्हा पाठीशी फक्त भेकडांची वानवा"

एकच साकडं राज, मागतो तुम्हा चरणी
आचरण वाढावं आपलं, प्रत्येक मराठी मनी

- मनाली लामणे


अशाच काहीश्या मनाला भावणाऱ्याकविता:


Saturday, 28 March 2020

शिवबा - लाखोंचा पोशिंदा

शिवबा - लाखोंचा पोशिंदा 


शिवबा - लाखोंचा पोशिंदा


शिवबा, बेफिकीर पोलादी बाहुंचा
शिवबा, तळपत्या नंग्या तलवारींचा
शिवबा, बेलगाम सैरभैर वाऱ्यांचा
शिवबा, अखंड अज्ञात दऱ्या-खोऱ्यांचा   
शिवबा, अमर्याद अनंत दर्या किनाऱ्यांचा
शिवबा, गर्द गुमनाम कड्या-कपाऱ्यांचा 

शिवबा, पराक्रमी मुत्सद्दी शहाजींचा 
शिवबा, तेजस्वी अलौकिक जिजाऊंचा 
शिवबा, स्वाभिमानी सतेज सईबाईंची
शिवबा, धडाडत्या दिग्विजय संभाजीचा 

शिवबा, प्रत्येक मोकळ्या श्वासाचा  
शिवबा, रांगड्या मराठी मातीचा 
शिवबा, नवउम्मेद नवतरुण मनांचा
शिवबा, अफाट हिंदवी सामर्थ्याचा

शिवबा, खडतर अनिच्छित भूतकाळाचा  
शिवबा, धाडसी गनिमी वर्तमानाचा 
शिवबा, उज्वल बुलंद भवितव्याचा 

शिवबा, राजनीती धुरंदर 
शिवबा, प्रौढप्रताप पुरंदर 
शिवबा, पराक्रम्यांच्या इतिहासातील 
मैलाचा दगड...

-------||------


" प्रतिपच्चंद्रलेखेव 
वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा 
मुद्रा भद्राय राजते "

- संपत 




अशाच काहीश्या मनाला भावणाऱ्याकविता:

Thursday, 12 December 2019

'अ'ची बाराखडी - 'शिव'स्वराज्य

शिव'स्वराज्य

--------------------------------

स्वराज्यांन आम्हाला फक्त 'अ'ची बाराखडीच शिकवली
अन तीच आम्हाला आयुष्यभरासाठी आधारवड ठरली 

🚩🚩🚩

असामान्य कर्तृत्व 
असाधारण नेतृत्व 
अखंड तपश्चर्या 
अविरत मेहनत
अज्ञात शत्रू  
अगणित लढाया 
अफाट धाडस
अचंबित चढाया 
अमाप शौर्य
अतुल्य स्वराज्यनिष्ठा 
अविस्मरणीय बलिदान
अलिखित इतिहास 

Chatrapati Shivaji

लागला जीव जरी पणाला 
राजा थांबला नाही 
राजा थटला नाही 
निश्चय ढळला नाही 

- संपत 

Saturday, 23 November 2019

छावा - छत्रपती संभाजी महाराज


छावा

-----------------


Image result for chava sambhaji maharaj painting"

तो जन्मला,
 निधड्या छातीच्या वाघापोटी 

तो घडला,
 हिंदवी स्वराज्यासाठी

तो लढला,
 फक्त जिंकण्यासाठी

तो नडला,
 पुरून उरण्यासाठीच

प्राणज्योत मावळली 
 शिवधर्मासाठी

अर,उभा इतिहास थटला तयासाठी
पण ...
 'सर्जा संभा' नटला
फक्त भगव्या आसमंतासाठी


- संपत


अशाच काहीश्या मनाला भावणाऱ्या कविता: