Showing posts with label संपत. Show all posts
Showing posts with label संपत. Show all posts

Friday, 4 September 2020

आभाळ दाटुन आलय...

आभाळ दाटुन आलय


आभाळ दाटुन आलय,

जुन्या आठवणींना मन भेटून आलय...


वातावरणातील गारवा

मनाला ओलावा देऊन जातोय;

आठवणींचा इंद्रधनुष्य,

क्षणाक्षणाला रंग बदलतोय. 


चिंब पावसाच्या सरी,

बेफान इकडे-तिकडे नाचतात;

उरले-सरले अनेक क्षण,

नजरेसमोर साठतात.


विजांच्या कडकडाटामुळे,

मन भांबावून गेलय. 

आभाळ दाटुन आलय,

जुन्या आठवणींना मन भेटून आलय...


पाऊसाचं अन माझं 

तस फार पूर्वीपासूनच नातं हाय... 

नभा'मधल आभाळ माझ्यासाठी 

आई-बा'परास मोठं हाय... 


मनामधल्या भावनांच्या पुराला, पाऊसान'च उधाण येत.  

स्वतामध्येच कोंडल्या माझ्या विचारांना, पाऊसामुळेच पाझर फुटतो. 


लेखणीला आलेल्या धारेनं,

आता पेनही जड वाटतोय.  

नव सरींच्या प्रत्येक थेंबानं,

जणू आठवणींचा बांध फुटतोय. 


मी माझ्यामध्येच समावतोय... 

मी माझ्यामध्येच विसावतोय... 

- संपत


....***....


  खालील कविता तुम्हाला नक्की आवडतील...


 

  Do Like, Share and Support our work.

        theartistpage_



Sunday, 23 August 2020

मी

मी


मी कोणालाही न कळलेला...

मी कोणालाही न कळणारा...

मी माझ्या माझ्यामधेच गुंफणारा...


मी थोडासा वेडसर, स्वतःसोबतच हसणारा

मी थोडासा खोडसर, स्वतःलाच बिलगणारा


मी नेहमीच शांत

अंतरंगात दंगणारा


मी भावनांचं गुंफण

मी विचारांचं मंथन

मी अपार, अनिश्चित

मी अतुल्य, अभिक्षित

मी निर्लज्य, बेलगाम

मी क्षणिक, क्षण-भुंगुर


मी लखलखता दिवा

मी लुकलुकता काजवा

मी मावळती रात्र

मी उभारणारा दिवस

मी अंधाराने प्रकाशाशी केलेला सत्तेसाठीचा संघर्ष


मी असाच,

मी कोणालाही न कळलेला...

मी कोणालाही न कळणारा...

  - संपत


Sunday, 10 May 2020

बाप | an Unconditional Sacrifice

बाप

तुझ्या ताटातील भाकरीसाठी
कोणीतरी घाम गाळत असतं...

तुझ्या वाट्यातील आनंदासाठी
कोणीतरी आपली दुःख गिळत असतं...

तुझ्या फूल-सजल्या वाटांसाठी
कुणीतरी जळते निखारे तुडवत असतं...

तुझ्या यशाच्या प्रवासात
कुणीतरी आपली स्वप्न रंगवत असतं...

तुझ्या मस्तकावर आशीर्वादाचा
कुणीतरी दैवापेक्षा मोठा हात ठेवत असत...


परतीच्या वाटेवर निघालेली पावले रोखत,
धगधगत असलेल्या हुंदक्यांना आवरत,
थकलेल्या बाहुंणा तोलाने सावरत,
तत्व-विचारांचा पैलू ताठ मानाने मिरवत,
कणखरतेच्या नावाखाली जबाबदाऱ्यांच ओझ पेलवत,
कुणीतरी बाप म्हणून वावरत असतं....

तो राकट
तो तापट
तो प्रेमळ
तो कणखर
तो गंभीर
तरीपण खंबीर
तोच पालनहार
तोच कर्ताधर्ता

तो बुरुजासम सक्षम
तो सागरासम विशाल
नो नभासम अफाट

मुलगा नावाच्या नटाच्या चित्रपटातील पडद्यामागचा नट "बाप"

- संपत

तुम्हाला नक्की पहायला आवडतील असे आणखी काही लेख


Wednesday, 29 April 2020

माय - तुजवीण अपुरा


तुजवीण अपुरा 

------------------------||------------------------

जखमी अवस्थेतल लहानगस पोर, एक माय धावत धावत इस्पितळात घेऊन आली. हातांत चिमुकलं होत तिच्या, ना कसली हालचाल, ना कसलं रडणं फक्त शांत पडलं होत ते माईच्या खुशीत...

बहुदा जाणीव झाली असावी त्याला आईसोबतच्या त्या शेवटच्या क्षणांची, 
तिच्या त्या  शेवटच्या स्पर्शाची....


माय


आज मी मृत्यूला स्वतःच्या डोळ्यादेखत घडताना पाहिला
आई पासून तो पोरगा एका क्षणात दुरावताना पाहिला

आक्रोशाने तिच्या हादरला माहोल सारा
आज माय विसररुन गेली स्वतःला
आज तिचा लेक सोडून चालला जगाला

हात जोडून मागं घालत, धमकावलं तीन देवाला
विनवण्या करत करत, ठणकावलं डॉक्टरला
पोरगा जगवा माझा, हवं तर मला धडा परतीला

तिचा तो हर एक प्रयत्न, तूटा पडताना मी पाहिला,
चिमुकला तो जीव, तिच्या डोळ्यादेखत निर्जीव होताना मी पाहिला....

आसपासची माणसं, कोणीही कुणाचा नसत
इवलुस पोर ते, अचानक अस्तित्वहींन होत.

आज तो डॉक्टर मी,
पुन्हा एकदा हरताना पाहिला...
माणसातला देव तो,
पुन्हा एकदा संपताना पाहिला ...
दगडातला तो देव,
मी दगडातच राहताना पहिला ...

निपचित पडला देह पोराचा,
डोळ्यादेखत आई-बा'च्या
सुन्न झाला बाप, स्वतः हुंदका गिळत
आईला घेत कवेत, तिला सावरताना
तरीपण हतबल होताना
मी पहिला....

दोन मिनिटांपूर्वी
फकस्त दोनच मिनिटांपूर्वी ,
तो चिमुकला मृत्यूशी झगडत होता...
पण जाणाऱ्या हर एक घटकेसोबत
पोरगा, आई-बा पासून दुरावत होता...

दूर गेल पोर पुन्हा माग नाही आल
नव्हतच कधी ते माईचं
आता देवाचा मात्र झाल...


का रे विठुराया?? 
अशी परीक्षा घेतलीस तिची
तोडायचंच असेल आईला पोरापासून तर...
नकोना बांधत जाऊ

अश्या तुटणाऱ्या गाठी, अश्या तुटणाऱ्या गाठी...


: A poem by संपत


You may also like to visit 


Saturday, 28 March 2020

शिवबा - लाखोंचा पोशिंदा

शिवबा - लाखोंचा पोशिंदा 


शिवबा - लाखोंचा पोशिंदा


शिवबा, बेफिकीर पोलादी बाहुंचा
शिवबा, तळपत्या नंग्या तलवारींचा
शिवबा, बेलगाम सैरभैर वाऱ्यांचा
शिवबा, अखंड अज्ञात दऱ्या-खोऱ्यांचा   
शिवबा, अमर्याद अनंत दर्या किनाऱ्यांचा
शिवबा, गर्द गुमनाम कड्या-कपाऱ्यांचा 

शिवबा, पराक्रमी मुत्सद्दी शहाजींचा 
शिवबा, तेजस्वी अलौकिक जिजाऊंचा 
शिवबा, स्वाभिमानी सतेज सईबाईंची
शिवबा, धडाडत्या दिग्विजय संभाजीचा 

शिवबा, प्रत्येक मोकळ्या श्वासाचा  
शिवबा, रांगड्या मराठी मातीचा 
शिवबा, नवउम्मेद नवतरुण मनांचा
शिवबा, अफाट हिंदवी सामर्थ्याचा

शिवबा, खडतर अनिच्छित भूतकाळाचा  
शिवबा, धाडसी गनिमी वर्तमानाचा 
शिवबा, उज्वल बुलंद भवितव्याचा 

शिवबा, राजनीती धुरंदर 
शिवबा, प्रौढप्रताप पुरंदर 
शिवबा, पराक्रम्यांच्या इतिहासातील 
मैलाचा दगड...

-------||------


" प्रतिपच्चंद्रलेखेव 
वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा 
मुद्रा भद्राय राजते "

- संपत 




अशाच काहीश्या मनाला भावणाऱ्याकविता:

Saturday, 21 March 2020

शेतकरी वारकरी



शेतकरी वारकरी 

शेतकरी वारकरी

आला रिमझिम पाऊस दारी 
नाले नद्यांच्या वाटा धरी 

सूर्य निजला भूर आकाशी
गर्जे नभा-नभातुन पाणी 

बैल लागणीच्या पैऱ्यावरी 
मालक चाबूक निजी करी 
मानेवरती औत डौलावीत
शिवाराला सुटती सरी

पिके डौलती वाऱ्यावरी 
हिरवळ सजली भूईवरी
संग पावसाच्या सरी

पाहून वेळ राय बरी
आंम्ही वारकरी वारकरी 
सारे पंढरीच्या वाटा धरी 
विठुराया आहे संग माझ्या 
आता कसली चिंता मनी?

माऊलीच्या गजरात 
टाळ मृदूंग भजनात 
ज्ञान तुकोबा संगतीनं 
देवा पदरी घाल माझ्या 
सारी सुख शांतता समृद्धी 
सुख शांतता समृद्धी 

- संपत 


Farmer (The God's Servant)


It was sparkling rain
Rivers full of waters

The sun goes down
The sky is roaring

Bulls steps out to cultivate 
Owner whips there back 
Sweat on the neck
Farms leave for lines

with Rain showering
Crop waving aerial
Green decorated terrain


Looking at the time
We are Warkari Warkari (God's servant)
Hold all the way to God's meeting
Vitharaya (God) is with me
Now worry about anything?

In Maulee's (God) yard
In the noise of Tal and Mrudung (Indian Musical Instruments)
 with a company of  Dnyan (saint),  Tukoba (saint)
 God, Gift me 
All Happiness peace prosperity
Happiness peace prosperity


 ............. || .............


अशाच काहीश्या मनाला भावणाऱ्या कविता:

Thursday, 12 December 2019

'अ'ची बाराखडी - 'शिव'स्वराज्य

शिव'स्वराज्य

--------------------------------

स्वराज्यांन आम्हाला फक्त 'अ'ची बाराखडीच शिकवली
अन तीच आम्हाला आयुष्यभरासाठी आधारवड ठरली 

🚩🚩🚩

असामान्य कर्तृत्व 
असाधारण नेतृत्व 
अखंड तपश्चर्या 
अविरत मेहनत
अज्ञात शत्रू  
अगणित लढाया 
अफाट धाडस
अचंबित चढाया 
अमाप शौर्य
अतुल्य स्वराज्यनिष्ठा 
अविस्मरणीय बलिदान
अलिखित इतिहास 

Chatrapati Shivaji

लागला जीव जरी पणाला 
राजा थांबला नाही 
राजा थटला नाही 
निश्चय ढळला नाही 

- संपत 

Tuesday, 3 December 2019

माझं प्रेमात पडणं... | First Love


माझं प्रेमात पडणं...


First Love


एक पोरगी असावी 
लाखात एक दिसावी 
थोडीशी गालात हसावी 
कधीतरी माझ्यावर रुसावी 

भेटीस ती माझ्या  येता
मन भारावून जाईल 
नसे समोर ती माझ्या 
जीव सैरभीर होईल 

नखरेल तिची अदा 
बेधडक तिच वागणं 
बिंदास तीच बोलणं 
बेफिकीर तिच चालणं 

तीच हसणं-रुसणं, 
माझं प्रेमात पडणं...

तीच चालणं-बोलणं,
माझं प्रेमात पडणं...

तिचे मिचकते डोळे, 
माझं प्रेमात पडणं... 

तिचे लांब काळे केस, 
माझं प्रेमात पडणं...

डुलत्या कानातल्या कुड्या, 
माझं प्रेमात पडणं...

नाचती नाकातील नतनी,
माझं प्रेमात पडणं... 

गालावरती खळी, 
माझं प्रेमात पडणं...

तीच माझ्यात रमण, 
माझं प्रेमात पडणं...

तीच माझ्यात असंण,
माझं प्रेमात पडणं...



उगवेल तो सूर्य,
उजाडेल ती पहाट,
सजेल मंडप दारी, 
सारे पाहुणे-रावळे घरी 

वाट पाहतो मी नेहमी 
त्या सुंदर क्षणाची 
सनई-चौघड्या साथीनं 
तीच माझं होण्याची 

उरल्या सात जन्मी  
तिचा जोडीदार बनून राहण्याची....
फक्त तिचा अन तिचाच होण्याची....
फक्त तिचा अन तिचाच होण्याची...

- संपत






Saturday, 23 November 2019

छावा - छत्रपती संभाजी महाराज


छावा

-----------------


Image result for chava sambhaji maharaj painting"

तो जन्मला,
 निधड्या छातीच्या वाघापोटी 

तो घडला,
 हिंदवी स्वराज्यासाठी

तो लढला,
 फक्त जिंकण्यासाठी

तो नडला,
 पुरून उरण्यासाठीच

प्राणज्योत मावळली 
 शिवधर्मासाठी

अर,उभा इतिहास थटला तयासाठी
पण ...
 'सर्जा संभा' नटला
फक्त भगव्या आसमंतासाठी


- संपत


अशाच काहीश्या मनाला भावणाऱ्या कविता: