Sunday, 21 June 2020

पेमात पडावस वाटत...


पेमात पडावस वाटत...
पेमात पडावस वाटत

 
न्हवत मला कुणावर प्रेम करायचं 
न्हवत मला त्या नात्यात गुंतायचं

पण,
काय कसे झाले उमगलंच नाही
तुझे ते निरागस अन लोभस रूप पाहून 
प्रेमाच्या सागरात कधी उडी घेतली, कळलंच नाही... 

आयुष्याची नवं-नवीन स्वप्ने पाहता पाहता 
तुझ्या रूपाने एक नवीन जीवन सुखावून गेलं 

शब्दांच्या दुनियेतील परी तू,
किती करू कौतुक मी... 

शृंगारिक तुझी लेखणी दिसली, 
नकळत मनी प्रेम-लहर उठली...
तुझे ते मनमोहक सौंदर्य
नकळत मनी प्रेम-लहर उठली...
तुजा तो सहज नृत्याविष्कार, 
नकळत मनी प्रेम-लहर उठली...
चुकला काळजाचा ठाव, 
नकळत मनी प्रेम-लहर उठली...
 
तुझं ते तिखट वागणं,
मला तुझंपासून लांब सारण... 
त्या दुराव्यातील गोडवा,
मज पुन्हा तुजपाशी आणणं... 

शब्दांच्या मैफिलीत मला असच रंगून रहावस वाटत,
त्याच मैफिलीचा भाग होऊन तुझं अन तुझंच व्हावंसं वाटत,
माहित असूनही अवघड तुझा सहवास,
मला पेमात पडावस वाटत... 



असेच आणखी काही लेख:


No comments:

Post a Comment