Showing posts with label बाप. Show all posts
Showing posts with label बाप. Show all posts

Tuesday, 12 May 2020

आई - एक सुंदर स्वप्न


आई - एक सुंदर स्वप्न
आई - एक सुंदर स्वप्न


अवघ्या कुटुंबाची काळजी वाहते ती आई.
मांगल्याचे सार असते ती आई.
ज्ञानाचे आणि संस्कारांचे व्यासपीठ म्हणजे आई.
शौर्य अन् पराक्रमाच बिजांकुर म्हणजे आई.
ज्योती सारखी सतत तेवत राहून, 
आयुष्यभर इतरांना प्रकाशमान करते ती आई 



असेच आणखी लेख वाचा :


Sunday, 10 May 2020

बाप | an Unconditional Sacrifice

बाप

तुझ्या ताटातील भाकरीसाठी
कोणीतरी घाम गाळत असतं...

तुझ्या वाट्यातील आनंदासाठी
कोणीतरी आपली दुःख गिळत असतं...

तुझ्या फूल-सजल्या वाटांसाठी
कुणीतरी जळते निखारे तुडवत असतं...

तुझ्या यशाच्या प्रवासात
कुणीतरी आपली स्वप्न रंगवत असतं...

तुझ्या मस्तकावर आशीर्वादाचा
कुणीतरी दैवापेक्षा मोठा हात ठेवत असत...


परतीच्या वाटेवर निघालेली पावले रोखत,
धगधगत असलेल्या हुंदक्यांना आवरत,
थकलेल्या बाहुंणा तोलाने सावरत,
तत्व-विचारांचा पैलू ताठ मानाने मिरवत,
कणखरतेच्या नावाखाली जबाबदाऱ्यांच ओझ पेलवत,
कुणीतरी बाप म्हणून वावरत असतं....

तो राकट
तो तापट
तो प्रेमळ
तो कणखर
तो गंभीर
तरीपण खंबीर
तोच पालनहार
तोच कर्ताधर्ता

तो बुरुजासम सक्षम
तो सागरासम विशाल
नो नभासम अफाट

मुलगा नावाच्या नटाच्या चित्रपटातील पडद्यामागचा नट "बाप"

- संपत

तुम्हाला नक्की पहायला आवडतील असे आणखी काही लेख