मैत्री
![]() |
मैत्री |
मैत्री म्हणजे...
वेलीवरती उमललेलं फुल
स्वार्थाची आलेली भूल
मैत्री म्हणजे
विधात्याला पडलेलं स्वप्न
नावरत्नांच्या हारामधलं रत्न
मैत्री म्हणजे
पावसाची ती पहिली सर
कट्ट्यावर उडवलेली टर
मैत्री म्हणजे
सुख दुःखात दिलेली साथ
मदतीला नेहमीच पहिला हाथ
मैत्री,
संकटात मदत करणारी
प्रसंगी कठोरही होणारी
मैत्री
दोन मने जोडणारी अरुंद पाऊलवाट
मैत्रीचा दुसरा अर्थ जणू
तुझी अन माझी रेशीमगाठ
- प्रज्योत सर्वोदय
Some more feeds
Rise Awareness
No comments:
Post a Comment