![]() |
मी कुणाला कळलो नाही |
मित्र कोण आणि शत्रू कोण,
गणित साधे कळले नाही !
नाही भेटला कोण असा,
ज्याने मला छळले नाही !
सुगंध सारा वाटत गेलो,
मी कधीच हरवळलो नाही !
ऋतू नाही असा कोणता,
ज्यात मी होरपळो नाही !
केला सामना वादळांशी,
त्यांमुळे भरकटलो नाही !
सामोरा गेलो संकटांना,
त्यांना पाहून वळलो नाही !
पचवून टाकलं दुःख सार,
कधीच मी हळहळलो नाही !
आले जीवनी सुख जरी,
कधीच मी भाळलो नाही !
आले जीवनी सुख जरी,
त्याला कधी भाळलो नाही !
ना सोडली कास सत्याची,
खोट्यांन कधीच मळलो नाही !
सोडून गेले माझेच मला,
मी कुणाला कधी कळलोच नाही !
असेच आणखी काही लेख: