Sunday, 23 August 2020

मी

मी


मी कोणालाही न कळलेला...

मी कोणालाही न कळणारा...

मी माझ्या माझ्यामधेच गुंफणारा...


मी थोडासा वेडसर, स्वतःसोबतच हसणारा

मी थोडासा खोडसर, स्वतःलाच बिलगणारा


मी नेहमीच शांत

अंतरंगात दंगणारा


मी भावनांचं गुंफण

मी विचारांचं मंथन

मी अपार, अनिश्चित

मी अतुल्य, अभिक्षित

मी निर्लज्य, बेलगाम

मी क्षणिक, क्षण-भुंगुर


मी लखलखता दिवा

मी लुकलुकता काजवा

मी मावळती रात्र

मी उभारणारा दिवस

मी अंधाराने प्रकाशाशी केलेला सत्तेसाठीचा संघर्ष


मी असाच,

मी कोणालाही न कळलेला...

मी कोणालाही न कळणारा...

  - संपत