Saturday, 11 July 2020

विठ्ठल विठ्ठल


विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल 


गोडवी तुझी गातो घ्यावी देवा ऐकून,
रूप तुझे जणू चमत्कार,
आमच्या मनाचा ठाव समजून घे, 

रूप तुझं मोठं देवा, 
कीर्ती तुझी महान देवा,
कोड आउंदा मोठं देवा,
अभंग-ओव्या यंदा घरूनच देवा, 
भागव लेकूरबाळ्यांची तहान....
विठ्ठल विठ्ठल...

रंग तुझा सावळा देवा,
वसला तू विटेवरी...
सगळ्यांना तारून देवा,
तू तनी-मनी बसला...
विठ्ठल विठ्ठल...

नाव तुझे घेता देवा,
थकवा कुठल्या-कुठे विरतो,
आत्मविश्वास आमच्या मनी-मनी,
तुझ्या रूपे स्थिरावतो...
विठ्ठल विठ्ठल...

सुख-दुःखाच्या क्षणी देवा,
नेहमी तुझचं नामस्मरण...
विठ्ठल विठ्ठल...

आशीर्वाद असुदे देवा तुझा,
सदैव आमच्या डोईवर...
विठ्ठल विठ्ठल...



अशाच काहीश्या मनाला भावणाऱ्या कविता