शिवबा - लाखोंचा पोशिंदा
शिवबा, बेफिकीर पोलादी बाहुंचा
शिवबा, तळपत्या नंग्या तलवारींचा
शिवबा, बेलगाम सैरभैर वाऱ्यांचा
शिवबा, अखंड अज्ञात दऱ्या-खोऱ्यांचा
शिवबा, अमर्याद अनंत दर्या किनाऱ्यांचा
शिवबा, गर्द गुमनाम कड्या-कपाऱ्यांचा
शिवबा, पराक्रमी मुत्सद्दी शहाजींचा
शिवबा, तेजस्वी अलौकिक जिजाऊंचा
शिवबा, स्वाभिमानी सतेज सईबाईंची
शिवबा, धडाडत्या दिग्विजय संभाजीचा
शिवबा, प्रत्येक मोकळ्या श्वासाचा
शिवबा, रांगड्या मराठी मातीचा
शिवबा, नवउम्मेद नवतरुण मनांचा
शिवबा, अफाट हिंदवी सामर्थ्याचा
शिवबा, खडतर अनिच्छित भूतकाळाचा
शिवबा, धाडसी गनिमी वर्तमानाचा
शिवबा, उज्वल बुलंद भवितव्याचा
शिवबा, राजनीती धुरंदर
शिवबा, प्रौढप्रताप पुरंदर
शिवबा, पराक्रम्यांच्या इतिहासातील
मैलाचा दगड...
-------||------
" प्रतिपच्चंद्रलेखेव
वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा
मुद्रा भद्राय राजते "