पोरी अशाच का असतात
ह्या पोरी अशाच का असतात...?
नेहमीच का नाही म्हणतात...?
माझं आधीच ठरलंय..
तुला माझ्यापेक्षा कोणीतरी चांगली मिळेल...
मला तू आवडत नाहीस...
मी तुझ्याबद्दल असा कधी विचारच केलं नाही...
पोरी नेहमी असच का म्हणतात...?
पोरी नेहमी असच का म्हणतात...?
पोरी नेहमी अशाच का असतात...?
नाही म्हणतात अन विसरूनही जातात...
आयुष्य तुटल्यासारखं वाटत
काहीतरी सुटल्यासारखं वाटत
कुठंतरी हरविल्यासारखं वाटत
कोणीतरी नसल्याची सल नेहमीचं बोचत राहते मनाला..
मित्रांनी हसवण्यासाठी केलेला तो फसलेला प्रयास
'टेन्शन फ्री' होण्यासाठी माझा 'सोलो ट्रिप'चा' ध्यास
झिंगून जाण्यासाठी घेतलेला दारूचा तो वास
कस सांगू सगळ्यांना, किती अवघड बनलाय प्रवास.....
अशाच त्या वातावरणात...
माझं उगाच बिंधास्त वागणं,
जाऊ दे गेली तर, मिळतील सतराशे-साठ,
स्वतः स्वतःलाच सांगणं...
स्वप्नांशी तडजोड,
मित्रांशी काडीमोड,
लढण्याचा निर्धार,
भिडण्याची विचार,
बेधुंद वाटचाल,
प्रेमात आरपार..
आठवणीत तिच्या, जीव झुरे दिस-रात
तिच्या संग दिसे मला, माझ्या स्वप्नातला गाव
व्हरांड्यात खेळी बघ कसं, तुझ-माझ पोर
एकमेकां-संगतीन थाटू, सोन्याचा संसार
केली मनाची तयारी
म्हटल टाकू विचारुन
एका क्षणात तिच्या नकारणं
पुरता गेला मी विस्कळून
तुटलं ते मन
फाटलं ते आभाळ
सुटला तो क्षण
घोंगावल तुफान
झालो मी बेभान
तुटलं ते मन
फाटलं ते आभाळ
सुटला तो क्षण
घोंगावल तुफान
झालो मी बेभान
म्हंणून गेले कविवर्य
प्रेम हे प्रेम, असत तुमचं आमचं 'सेम'
सांगायला विसरले बहुतेक कुसुमाग्रज
पुढचा एवढा मोठा 'गेम'
शेवटी एकच कळत राया
कधीच करू नये प्रेम
प्रेम असत प्रेम
पोरगी भातुकलीचा खेळ
- Creo
अशाच काहीश्या मनाला भावणाऱ्याकविता: